“EVM हटल्याशिवाय भारतात खरी लोकशाही नाही! 2029 पूर्वी अंतिम लढ्याची घोषणा – अनंत केरबाजी भवरे”
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २० :- “EVM + VVPAT ही लोकशाहीची गळचेपी आहे आणि देशातील प्रत्येक समस्येची खरी जननी आहे!” असा स्फोटक आरोप करत संविधान विश्लेषक अनंत केरबाजी भवरे (रेणापूरकर) यांनी 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही व्यवस्था कायमची हटविण्याचा अंतिम लढा छेडण्याची घोषणा केली आहे.
भवरे यांनी ठाम शब्दांत सांगितले – “आता आमच्या जीवनात एकच दृढनिश्चय उरला आहे. EVM + VVPAT हटल्याशिवाय भारतात खरी लोकशाही उभी राहणार नाही. यासाठी वाट्टेल तो त्याग करण्याची तयारी माझी आहे. कोणत्याही पक्षाने समर्थन दिलं किंवा नाही, याची मला तमा नाही. कारण शपथ पक्ष घेत नाहीत, जनता घेते. आणि ही जनतेचीच लढाई आहे!”
ते पुढे म्हणाले की, मोदी गेले, राहुल आले किंवा आणखी कुणीही प्रधानमंत्री झाले तरी या लढ्याला विराम नाही. “देशाच्या आणि राज्याच्या प्रत्येक क्षेत्रातील समस्या EVM मुळेच निर्माण झाल्या आहेत. म्हणून या मशीन हटल्याशिवाय लोकशाही म्हणजे फक्त एक दिखावा आहे. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा पेटवत राहू!” असा त्यांचा इशारा आहे.
👉 भवरे यांनी यावेळी स्पष्ट केले की, EVM हटविण्यासोबतच ते संविधान जागृती आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण या मोहिमेलाही देशव्यापी वळण देणार आहेत.
✊ थेट आवाहन :
“भारतातील प्रत्येक जागरूक नागरिकाने आता या संघर्षात उतरलेच पाहिजे. कारण ही फक्त माझी लढाई नाही, तर तुमच्या-आमच्या लोकशाहीचा श्वास वाचविण्याची लढाई आहे!”