“eKYC मुळे मोठी छाटणी! ‘लाडकी बहीण’ योजनेतून ६८ लाख महिला बाहेर; सरकारचे १२ हजार कोटींची बचत”

“eKYC मुळे मोठी छाटणी! ‘लाडकी बहीण’ योजनेतून ६८ लाख महिला बाहेर; सरकारचे १२ हजार कोटींची बचत”
“eKYC मुळे मोठी छाटणी! ‘लाडकी बहीण’ योजनेतून ६८ लाख महिला बाहेर; सरकारचे १२ हजार कोटींची बचत”

✍️ महाराष्ट्र वाणी

मुंबई दि १३ :- महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. eKYC प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे तब्बल ६८ लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांचा पुढील लाभ थांबवण्यात आला आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवरचा मोठा ताण कमी होणार असून सुमारे १२ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे.

या योजनेची सुरुवात जुलै २०२४ मध्ये करण्यात आली होती. सुरुवातीला जवळपास २ कोटी ४७ लाख महिला लाभार्थी म्हणून नोंदल्या गेल्या होत्या. मात्र, त्यापैकी केवळ १ कोटी ४७ लाख महिलांनीच eKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे उर्वरित ६८ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे.

सरकारने लाभार्थ्यांना eKYC साठी ३० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. तरीही अनेकांनी प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांचा लाभ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांत अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात सुमारे २० हजार कोटी रुपये वितरित झाले होते.

या बदलामुळे योजनेचा वार्षिक खर्चही कमी होणार आहे. आधी अंदाजे ४३,७४० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता, मात्र आता तो सुमारे ३१,५०० कोटी रुपयांपर्यंत खाली येणार आहे. परिणामी, शासनाला मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होणार आहे.

“eKYC केलं नसेल तर अजून वेळ आहे—नाहीतर ‘लाडकी’ यादीतून नाव कायमचं गायब होऊ शकतं!”