CEIR पोर्टलच्या मदतीने जवाहरनगर पोलिसांची यशस्वी कारवाई – 15 महागडे मोबाईल हस्तगत, 4.20 लाखांचा मुद्देमाल परत!

मोबाईल कंपन्यांमध्ये वन प्लस, सॅमसंग, रेडमी, ओपो, विवो, रिअलमी अशा नामांकित ब्रँडचा समावेश

CEIR पोर्टलच्या मदतीने जवाहरनगर पोलिसांची यशस्वी कारवाई – 15 महागडे मोबाईल हस्तगत, 4.20 लाखांचा मुद्देमाल परत!
CEIR पोर्टलच्या मदतीने जवाहरनगर पोलिसांची यशस्वी कारवाई – 15 महागडे मोबाईल हस्तगत, 4.20 लाखांचा मुद्देमाल परत!

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १२ जुलै :- जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांत चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन पुन्हा शोधण्यात मोठे यश आले आहे. CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या साहाय्याने पोलिसांनी तब्बल १५ महागडे मोबाईल फोन हस्तगत केले असून त्यांची एकूण किंमत सुमारे ४ लाख २० हजार रुपये आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या आदेशावरून पोलीस अंमलदार मारोती गोरे यांनी केली असून छत्रपती संभाजीनगर, बिहार, मध्यप्रदेश तसेच अन्य जिल्ह्यांमधून हरवलेले मोबाईल मिळवण्यात आले.

मोबाईल कंपन्यांमध्ये वन प्लस, सॅमसंग, रेडमी, ओपो, विवो, रिअलमी अशा नामांकित ब्रँडचा समावेश असून काही मोबाईल ८४ हजार रुपयांपर्यंत किंमतीचे आहेत.

CEIR पोर्टलवर IMEI नंबरद्वारे शोध घेऊन खालीलप्रमाणे मोबाईल हस्तगत करण्यात आले –

(नमुना - काही निवडक उदाहरणे):

वन प्लस – ₹30,000

सॅमसंग – ₹84,000

ओपो – ₹22,000

रिअलमी – ₹21,000

विवो – ₹26,000

तक्रारदारांनी आपल्या भावना व्यक्त करत पोलिसांचे मनापासून आभार मानले. काहींच्या मोबाईलचे हप्ते अजूनही सुरू होते, काहींना कुटुंबीयांनी भेट दिलेले मोबाईल होते. मोबाईल पुन्हा मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी नागरिकांना आवाहन केले की, मोबाईल चोरीला गेल्यास अथवा हरवल्यास त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. यामुळे शोधकार्य अधिक प्रभावी होते.

ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उप-आयुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, तसेच वरिष्ठ निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अंमलदार मारोती गोरे यांनी यामध्ये विशेष मेहनत घेतली.

 हरवलेला मोबाईल परत मिळवायचा आहे? मग CEIR पोर्टलचा आधार घ्या आणि जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा!