२ ऑगस्टला रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी बैठक; ना. रामदास आठवले करणार मार्गदर्शन

२ ऑगस्टला रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी बैठक; ना. रामदास आठवले करणार मार्गदर्शन

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई २९ जुलै :– रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची महत्वाची बैठक शनिवार, २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे (राज्य अध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष) असतील, तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष तसेच सर्व जिल्हाध्यक्ष सहभागी होणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्षाच्या सदस्यता अभियानाचा आढावा घेतला जाणार आहे.

मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असताना, या बैठकीत पक्षाची भूमिका निश्चित होणार आहे. ना. रामदास आठवले यांचे धोरणात्मक निर्णय व मार्गदर्शन यामुळे बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

राज्य कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केले आहे.

🗓️ बातम्यांच्या केंद्रस्थानी राहा – महाराष्ट्र वाणी!