हर्सुल परिसरात नवीन आरोग्य केंद्रासाठी नगरसेवक अजहर पठाण यांची ठोस मागणी!

फुलेनगर, करीमनगर, एकबालनगर येथे लवकरच सुसज्ज आरोग्य सुविधा मिळणार?

हर्सुल परिसरात नवीन आरोग्य केंद्रासाठी नगरसेवक अजहर पठाण यांची ठोस मागणी!
हर्सुल परिसरात नवीन आरोग्य केंद्रासाठी नगरसेवक अजहर पठाण यांची ठोस मागणी!

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ४ :- प्रभाग क्र. १ हर्सुल अंतर्गत फुलेनगर, करीमनगर व एकबालनगर परिसरात नवीन आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक अजहर पठाण यांनी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्याकडे केली आहे.

हर्सुल परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उपचारासाठी दूर अंतरावर जावे लागत आहे.

सध्याच्या परिस्थितीत प्राथमिक उपचार, लसीकरण, माता-बाल आरोग्य सेवा, नियमित तपासणी तसेच आपत्कालीन उपचारासाठी स्वतंत्र व सुसज्ज आरोग्य केंद्र अत्यंत आवश्यक बनले आहे. त्यामुळे या भागात तातडीने नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे, अशी ठाम भूमिका नगरसेवक अजहर पठाण यांनी मांडली.

नवीन आरोग्य केंद्र स्थापन झाल्यास परिसरातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल, तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील ताणही कमी होण्यास मदत होईल.

यावेळी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी नवनिर्वाचित नगरसेवक अजहर पठाण यांचा सत्कार केला.

आरोग्य सुविधा मजबूत झाल्यास हर्सुलचा विकास अधिक वेगाने होईल!