हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त साईबाबा अनाथ आश्रमात भोजनदान

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त साईबाबा अनाथ आश्रमात भोजनदान
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त साईबाबा अनाथ आश्रमात भोजनदान

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३१ :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. सरताज पठाण यांच्या वतीने शहरातील साईबाबा अनाथ आश्रमातील लहानग्या बालकांना भोजनदान करण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जातीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता डॉ. पवन डोंगरे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरजिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा दिपालीताई मिसाळ, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अजय डिडोरे, तसेच साईबाबा आश्रमाचे व्यवस्थापक नितीन भैया आदी मान्यवर उपस्थित होते.

बालकांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला असून समाजासाठी संवेदनशील भूमिका बजावण्याचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा हा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

🔹 अशा सामाजिक उपक्रमातून समाजात आनंद व ऐक्याचा संदेश दिला जातो

"नेत्यांचा वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष नाही, तर आनंद वाटण्याचा दिवस ठरू शकतो, याचे सुंदर उदाहरण शहराने पाहिले!"