‘स्मार्ट’अंगणवाडीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

‘स्मार्ट’अंगणवाडीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.२४ :- जिल्ह्यातील अंगणवाडी स्मार्ट करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करावा,असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

महिला बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी घेतला. प्रधानमंत्री मातृवंदना योजना, अंगणवाडी विकास, बाल भिक्षेकरी निर्मूलन, बाल मृत्यू प्रतिबंधक अभियान, कुपोषण मुक्ती अभियान, बालविवाह रोखणे अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मंगला पांचाळ, बाल विकास अधिकारी गणेश पुंगळे, तालुका बालविकास अधिकारी मनिषा कदम, जी.आर. अंधारे, संतोष जाधव, श्रीमती कल्पना देशमुख तसेच सर्व तालुका बालविकास अदिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षक आदी दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील लाभार्थी गरोदर महिलांची नोंदणी, त्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी याबाबत माहिती देण्यात आली.जिल्ह्यातील अंगणवाडी ह्या स्मार्ट करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न व्हावेत. त्यात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असावा. सर्व शासकीय विभागांनी समायोजनातून हा उपक्रम राबवावा. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.