स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटनात्मक बांधणी अत्यावश्यक – अंबादास दानवे
महाराष्ट्र वाणी न्युज
गंगापूर, २६ जुलै :– आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी ही यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.
गंगापूर तालुक्यातील शेंदुरवाडा, जामगाव आणि गंगापूर शहर येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना दानवे म्हणाले की, “इच्छुक उमेदवारांनी बूथ केंद्रित नियोजन करून प्रचार व संघटनात्मक बांधणीवर भर द्यावा. तालुका स्तरावरील प्रमुखांनी शाखा व गटप्रमुखांची नियुक्ती लवकरात लवकर पूर्ण करावी.”
ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आणि कार्यकर्त्यांनी तातडीने तयारीला लागण्याचे आवाहन केले.
या संवाद बैठकीस लक्ष्मण भाऊ सांगळे, कृष्णा पाटील डोणगावकर, अंकुश सुंभ, अविनाश पाटील, तालुकाप्रमुख सुभाष कानडे, शहरप्रमुख भाग्येश गंगवाल, युवासेना जिल्हा युवाधिकारी विठ्ठल पाटील डमाळे, तसेच इतर अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गाव-पातळीवर शिवसेनेची तयारी सुरू – आता लक्ष निवडणुकीकडे!