सिल्लोड- सोयगावातील प्रत्येक मत सुहास शिरसाठ यांनाच; अब्दुल सत्तार यांचा विजयाचा विश्वास

सिल्लोड- सोयगावातील प्रत्येक मत सुहास शिरसाठ यांनाच; अब्दुल सत्तार यांचा विजयाचा विश्वास
सिल्लोड- सोयगावातील प्रत्येक मत सुहास शिरसाठ यांनाच; अब्दुल सत्तार यांचा विजयाचा विश्वास

महाराष्ट्र वाणी

सिल्लोड, दि.१२ :- औरंगाबाद व जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी आज सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

या भेटीदरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची दिशा, निवडणूक रणनीती तसेच मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदान करताना मतदारांनी आपले मत बाद होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले. तसेच सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे प्रत्येक मतदान सुहास शिरसाठ यांना मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांना प्रथम पसंतीचे मतदान देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, राजूबाबा काळे, नंदकिशोर सहारे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरपरिषदेतील शिवसेना गटनेते सुधाकर पाटील तसेच शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचत रहा महाराष्ट्र वाणी – आपल्या भागातील घडामोडींचा वेगवान आणि विश्वासार्ह आढावा!