सिल्लोड नगरपरिषद निवडणूक : काँग्रेसच्या भव्य पदयात्रेला उत्स्फूर्त जनसमर्थन! नगराध्यक्ष पदासाठी बनेखा पठाण यांना समर्थन
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड दि २५ :- आगामी सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला दमदार सुरुवात झाली. खासदार डॉ. कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली म्हसोबा महाराज मंदिरात नारळ फोडून प्रचारयात्रेला प्रारंभ झाला. काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी बनेखा पठाण यांना अधिकृत पाठिंबा दिल्याची घोषणा यावेळी औपचारिकपणे करण्यात आली.
प्रचाराच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांना खासदार डॉ. काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडले.
सभेत खासदार डॉ. काळे यांनी नागरिकांना संबोधित करताना नगराध्यक्ष पदासाठी बनेखा पठाण व नगरसेवक पदासाठी काँग्रेस-मित्रपक्ष आघाडीच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले.
या भव्य रॅलीत जिल्हाध्यक्ष किरणभाऊ डोणगावकर पाटील, पक्षनिरीक्षक डॉ. जफर खान, प्रदेश सरचिटणीस रविंद्रदादा काळे, उपप्रभारी गौरव जयस्वाल , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय अल्पसंख्याक विभाग चे प्रदेश सरचिटणीस कैसर आझाद शेख, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बनेखा पठाण, शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा. राहुल ताठे, माजी तालुकाध्यक्ष अजित पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष शेख शाकीर, शेख फिरोज व देविदास दांडगे तसेच आघाडीतील सर्व पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र वाणी — लोकमताची नवी धडाडी!