सिल्लोडमध्ये १६५ कुटुंबांच्या घरकुल स्वप्नांना पंख; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मंजुरी आदेशांचे वितरण

महाराष्ट्र वाणी

सिल्लोड दि ३ :- सिल्लोड शहरातील अनेक कुटुंबांच्या स्वतःच्या घराच्या स्वप्नपूर्तीकडे महत्त्वाचे पाऊल पडले आहे. सिल्लोड नगरपरिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेच्या जवळपास १६५ लाभार्थ्यांना बांधकाम मंजुरी आदेशांचे वितरण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.

नगर परिषद कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी लाभार्थ्यांना शुभेच्छा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रत्येक पात्र कुटुंबाला स्वतःचे हक्काचे घर मिळावे आणि शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील बेघर आणि गरजू कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

वाचत राहा महाराष्ट्र वाणी — तुमच्या हक्काच्या बातम्यांसाठी!