"सिरसाळा तांड्यात शिवसेनेला मोठे बळ! विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश"

"सिरसाळा तांड्यात शिवसेनेला मोठे बळ! विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश"
"सिरसाळा तांड्यात शिवसेनेला मोठे बळ! विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश"

महाराष्ट्र वाणी 

अंभई (प्रतिनिधी)दि.२५ :- शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे साहेब तसेच लोकनेते आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत सिरसाळा तांडा येथील भाजपसह विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते झालेल्या या प्रवेशप्रसंगी विकास पवार, संजय पवार, सोनसिंग राठोड, हिराभाऊ राठोड, विजय राठोड, रामा चव्हाण, गजानन राठोड, पलसिंग राठोड, मंगेश राठोड आदी कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी सातत्याने लढणारी शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी हे सर्व सहकारी निष्ठेने काम करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. युवकांना संघटनेत संधी देत त्यांना पुढील वाटचालीसाठी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी शुभेच्छा दिल्या.

या प्रवेशामुळे सिरसाळा तांडा परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. यावेळी अंभईचे उपसरपंच रईस देशमुख, रितेश जैस्वाल, मोहसीन देशमुख, अरविंद शिंदे व सिल्लोड येथील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

— शिवसेनेत वाढणारा जनसमर्थनाचा ओघ सिल्लोड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत देत आहे.