“सावळदबारा परिसराच्या विजेचा प्रश्न सुटणार!” – इद्रीस मुलतानींची मुख्यमंत्र्यांकडे धडक, फडणवीसांचा तत्काळ आदेश

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि २६ :- सिल्लोड–सोयगाव तालुक्यातील ग्रामस्थांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय, मुंबई येथे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी भेट घेऊन सावळदबारा परिसरासह १२ खेड्यांच्या गंभीर विजेच्या समस्येवर निवेदन सादर केले.

या विषयावर मुलतानी यांनी ठामपणे पाठपुरावा करताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी “विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढा” असा तातडीचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

निवेदनात या प्रमुख मागण्या समाविष्ट –

सावळदबारा परिसरातील बारा खेड्यांसाठी नवीन वीज लाईन

रवा जवळील जवळा पळासखेडा येथे नवीन 33 के.व्ही. उपकेंद्र

जरंडी व सोयगाव येथील 33 के.व्ही. केंद्रांची क्षमता वाढविणे

या मागण्यांना मिळालेल्या गतीमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या विजेच्या समस्येतून आता कायमचा दिलासा मिळणार आहे, अशी आशा व्यक्त होत आहे.

👉 ग्रामीण भागाचा आवाज ऐकू येतो, जेव्हा नेतृत्त्व ठाम उभं राहतं – महाराष्ट्र वाणी