शक्तिपीठ महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर-जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.२५ जुलै :- नागपूर -गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जमाबंद आयुक्त सुहास दिवसे यांनी आज येथे केले.
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग बाबत आयोजित भूसंपादन कार्यशाळेतील दुसऱ्या सत्रात श्री. दिवसे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते.
श्री. दिवसे म्हणाले, महामार्गासाठी च्या भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणाचे योगदान महत्वाचे आहे. शक्तिपीठ महामार्गची मोजणी अचूक व्हावी यासाठी गतीने सिमांकन करावे, मोणार्कने मोजणी केल्यास ते आपण डिजीटली पाहु शकतो सोबत विभागामार्फत ही मोजणी तपासता येणार आहे. राज्यात 10 हजार मोजणीदार पॅनलवर घेण्यात येत आहेत. मोठ्या तालुक्याला 100, मध्यम तालुक्याला 50 तर लहान तालुक्याला 25 खाजगी मोजणीदार देण्याचे प्रस्तावित आहे. तात्पुरत्या कच्च्या रेखांकनाची तरतूद करून त्याप्रमाणे काम केल्यास सुलभ होणार आहे.
1 कोटी 40 लाख नकाशे असून सर्व नकाशे डिजीटल स्वरूपात तयार करण्यात आले असून डिजीटल प्लॅटफॉर्मवर हे नकाशे उपलब्ध आहेत. भूमी अभिलेख विभागात मागील 25 वर्षात वेगाने तांत्रिक बदल झाले आहेत. मोजणीमध्ये, डिजीटायझेशन, ई-गव्हर्नस सातबारा, नकाशा आणि मोजणी असे बदल करण्यात आले असल्याचे श्री. दिवसे म्हणाले.
यावेळी संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.