राष्ट्रवादी कांग्रेसचा ‘निर्धार नवपर्वाचा’ मेळावा; सुनील तटकरे म्हणाले – “स्थानिक निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा!”

राष्ट्रवादी कांग्रेसचा ‘निर्धार नवपर्वाचा’ मेळावा; सुनील तटकरे म्हणाले – “स्थानिक निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा!”
राष्ट्रवादी कांग्रेसचा ‘निर्धार नवपर्वाचा’ मेळावा; सुनील तटकरे म्हणाले – “स्थानिक निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा!”

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १८ जुलै :- छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज शहरात “निर्धार नवपर्वाचा कार्यकर्ता संवाद मेळावा” मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच हा भव्य मेळावा घेण्यात आला असून, शहर व जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

या मेळाव्यात बोलताना खा. तटकरे म्हणाले की, “नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेले यश हे संघटनशक्तीचे फलित आहे. हेच यश आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्येही मिळवले पाहिजे. यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने, सक्रियपणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे.”

पक्षाच्या ताकदीचे दर्शन

या संवाद मेळाव्याला पक्षाच्या विविध स्तरांतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्रित नेतृत्व आणि संघटनेचे बळ अधोरेखित करणारे ठरले.

या वेळी उपस्थित असलेल्यांमध्ये

आमदार सतीश चव्हाण

विधान परिषदेचे सदस्य आ. विक्रम काळे

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष मा. रूपाली चाकणकर

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण

माजी खासदार आनंद परांजपे

आमदार कैलास पाटील

आमदार नितीन पाटील

कल्याण आखाडे, सुनील मगरे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. स्वाती कोल्हे

शहराध्यक्ष अभिजीत देशमुख, दत्ता भांगे, अनुराग शिंदे

यांच्यासह अनेक जिल्हा व शहर पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवचैतन्याचा संकल्प

मेळाव्यात पक्षाच्या आगामी दिशा, संघटनात्मक बळकटी, युवक व महिला सहभाग, तसेच स्थानिक मुद्द्यांवर जनतेशी थेट संपर्क वाढवण्याबाबत चर्चा झाली. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरला.

 “जनतेच्या विश्वासावर खरे उतरायचं असेल, तर आपली एकजूट आणि कष्ट हेच सर्वात मोठं शस्त्र आहे,” असे खा. तटकरे यांनी शेवटी सांगितले.

 राजकीय घडामोडींचा ठाव घेण्यासाठी, तुम्हीही ‘[महाराष्ट्र वाणी]’वर रहा अपडेट!