राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेचा लाभ घ्या- जिल्हाधिकारी स्वामी
आदिवासी महिला बचतगटांचा मेळावा

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.१२ :- आदिवासी महिला भगिनींनी आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक क्षेत्रात जबाबदारीने पुढे येऊन काम करावे आणि यशस्वी व्हावे. आदिवासी महिलांना सक्षम करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण व सबलीकरण योजना राबविली आहे. त्याचा लाभ सर्व आदिवासी महिलांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आदिवासी महिला बचत गटाचा मेळावा शनिवारी (दि.९) आयोजीत करण्यात आला. राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजने चा शुभारंभ सोहळा आयोजीत करण्यात आला होता. मुख्य सोहळा नागपूर येथे पार पडला. दुरदृष्यप्रणालीद्वारे या सोहळ्यात सगळ्यांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, प्रकल्पाधिकारी श्रीमती चेतना मोरे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या मेळाव्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर या जिल्ह्यातून आदिवासी महिला बचत गट उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, स्त्री एक शक्ती आहे, स्त्री ही अबाला नसून सबला आहे. विविध क्षेत्रात महिलांनी आपल्या स्वतः च्या कार्यकर्तुत्वाने उत्तुंग भरारी घेऊन नाव लौकिक मिळविला असून पुरुषांच्या बरोबरीने समर्थपणे जबाबदारी निभावत आहे. आपणही शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती साधावी.
मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित म्हणाले की, आदिवासी महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक क्षेत्रात मार्गक्रमण केले पाहिजे.
याप्रसंगी उपस्थित आदिवासी महिलांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना राखी बांधून औक्षण केले.
सभागृहात आदिवासी विकास विभागाचा मुख्य कार्यक्रम हा नागपूर ते संपन्न झाला. त्याचे थेट उपस्थित आदिवासी महिला बचत गटाच्या महिलांना व युवकांना दाखवण्यात आले.
सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. उद्धव वायाळ यांनी केले व आभार कार्यलय अधीक्षक गजानन रत्नपारखी यांनी केले.