राज्यातील भ्रष्ट मंत्र्याच्या हकालपट्टीसाठी शिवसेनेचे राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन; ११ ऑगस्टला क्रांती चौकात मोर्चा

राज्यातील भ्रष्ट मंत्र्याच्या हकालपट्टीसाठी शिवसेनेचे राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन; ११ ऑगस्टला क्रांती चौकात मोर्चा

महाराष्ट्र वाणी न्युज 

संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १० ऑगस्ट :

राज्यातील महायुती सरकारमधील कलंकित व भ्रष्टाचारी मंत्र्याची तात्काळ हकालपट्टी व्हावी या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ११ ऑगस्ट रोजी राज्यभर जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाचा भाग म्हणून संभाजीनगर जिल्ह्यातील मोर्चाचे आयोजन क्रांती चौक येथे करण्यात आले असून, शिवसेना नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संयोजकतेखाली हे आंदोलन पार पडणार आहे. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे प्रमुख उपस्थिती दर्शविणार आहेत.

सकाळी ११.३० वाजता क्रांती चौक येथे होणाऱ्या या जनआक्रोश आंदोलनात शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना, आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा व शहरातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

या आंदोलनासाठी आवाहन करणाऱ्यांमध्ये माजी आमदार उदयसिंग राजपूत, संपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, विजयराव साळवे, अनिल चोरडिया, राजेंद्र काळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरीभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे, मनोज पेरे, आनंद भालेकर, संजय मोटे, सोमीनाथ करपे, रघुनाथ घारमोडे, दिलीप मचे, सुभाष कानडे, सचिन वाणी, दिनेश मुथा, राजू वरकड, विष्णु जाधव यांचा समावेश आहे.

तसेच महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, सुनिता देव, अनिता मंत्री, आनंदीताई अन्नदाते, जिल्हा संघटक आशा दातार, लता पगारे, राखी परदेशी यांच्यासह युवासेना उपसचिव ऋषिकेश पाटील, सहसचिव ॲड. धर्मराज दानवे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे, विठ्ठल डमाळे, उमेश मोकासे व शुभम पिवळ यांनीही जनतेला सामूहिक उपस्थितीचे आवाहन केले आहे.

राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.