राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ निवड चाचणी १८ मार्चला
महाराष्ट्र वाणी
जळगाव दि १५ :- वरिष्ठ गट मुलांच्या राज्यस्तरीय आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धा (टियर वन) स्पर्धा १ एप्रिल २०२६ पासून सांगली येथे सुरू होत असून या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा फुटबॉल संघाची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही निवड चाचणी दि. १८ मार्च २०२६ पासून सकाळी ८.०० वाजता गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज, भुसावळ रोड, जळगाव येथील फुटबॉल मैदानावर होणार आहे. या चाचणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी संपूर्ण खेळ साहित्य (किट) सोबत आणणे आवश्यक आहे.
तसेच सहभागी खेळाडू हा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक असून त्यासाठी जन्म प्रमाणपत्र व आधार कार्ड सोबत आणणे बंधनकारक आहे. संबंधित खेळाडूंनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव फारुक शेख आणि कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवण्याची ही सुवर्णसंधी असून, जळगाव जिल्ह्याच्या संघात स्थान मिळवण्यासाठी उत्साह वाढला आहे. ⚽