येरवड्यात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी; समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सतीश शेरसिंग डागोर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन

येरवड्यात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी; समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
येरवड्यात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी; समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

येरवडा (प्रतिनिधी) दि ४ :- महाकाव्य रामायणाचे रचयिता आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त येरवडा येथील भगवान श्री वीर गोगादेव समाज मंदिरात जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सतीश शेरसिंग डागोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश मेहतर वाल्मिकी महासंघाचे अध्यक्ष रवी भाई परदेशी होते. यावेळी त्यांच्या हस्ते सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सतीश शेरसिंग डागोर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अध्यक्ष रवी परदेशी म्हणाले की, महर्षी वाल्मिकी ऋषींचे महान कार्य, त्यांचे विचार आणि मानवतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.

या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुधीर जानजोत, नरेश जाधव, चंद्रकांत चव्हाण, ऋषी परदेशी, डॉ. सुधाकर दास, मन्नूभाई कागडा, कनव चव्हाण, रवि वाघेला, राजू वेद, सुनील बेद, अर्जुन भाई सोलंकी, महेंद्र लालबिगे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती सोहळ्यात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित समाजबांधवांना महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र वाणी

सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित