मोटारसायकल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश: तीन सराईत चोर जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

मोटारसायकल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश: तीन सराईत चोर जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
मोटारसायकल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश: तीन सराईत चोर जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ९ :- ताहेरपूर (ता. पैठण) येथे घरासमोरून चोरलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल आणि गुन्ह्यात वापरलेली आणखी एक मोटारसायकल अशा एकूण ₹1 लाख किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत हस्तगत करत तीन सराईत चोरट्यांना जेरबंद केले.

फिर्यादी किरण सुखदेव गाडे (वय 44, रा. ताहेरपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून 8 डिसेंबर रोजी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक 1 ते 2 डिसेंबरदरम्यान त्यांच्या घरासमोरून मोटारसायकल चोरीला गेली होती.

गोपनीय माहितीवर सापळा, तिघांना रंगेहात पकडले

स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाली की

चोरी गेलेली मोटारसायकल पैठण येथील चैतन्य म्हस्के, अदिनाथ गिरजे आणि प्रसाद म्हस्के हे तीन युवक बिडकीन–गंगापूर रोडने विक्रीसाठी घेऊन जात आहेत.

पथकाने तात्काळ सापळा रचून तिन्ही आरोपींना दोन मोटारसायकलसह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

हस्तगत मुद्देमाल :

चोरी गेलेली स्प्लेंडर मो.सा. (MH-20 FZ 2028) – किंमत ₹20,000/-

गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मो.सा. (MH-20 HK 6248) – किंमत ₹80,000/-

आरोपींना मुद्देमालासह बिडकीन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

धडाकेबाज कारवाईत सहभागी अधिकारी

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार  राठोड,

अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपुर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत व पथकातील

महेश घुगे, कासीम शेख, सचिन राठोड, सुनील गोरे, बलविरसिंग बहुरे, योगेश तरमळे, जीवन घोलप यांनी केली.

महाराष्ट्र वाणी – बातमी ताजी, विश्वासार्ह!