मुस्लिम नुमाईंदा काउंसिलची मराठवाडा स्तरीय कार्यशाळा – ज्वलंत सामाजिक व कायदेशीर मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ८ ऑगस्ट :- "पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाज, धर्म किंवा राजकारणातील कोणताही उपक्रम माध्यमांशिवाय प्रभावीपणे राबवता येत नाही," असे प्रतिपादन मुस्लिम नुमाईंदा काउंसिलतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले. मुस्लीम नुमाईन्दा काऊन्सीलचे अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत संबोधीत करतांना खालील माहिती दिली आहे.
दि. १० ऑगस्ट २०२५, रविवार रोजी हज हाऊस, छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा स्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत तज्ञ व अभ्यासक समाजासमोर काही ज्वलंत व संवेदनशील विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करणार आहेत.
कार्यशाळेतील मुख्य सत्र व विषय:
1. वक्फची धार्मिक हैसियत – मुफ्ती अनिसुर्रहमान यांचे मार्गदर्शन.
2. वक्फ संशोधन कायदा २०२५ – ज्येष्ठ अभ्यासक अब्दुल रऊफ शेख (नागपूर) यांचे सखोल विश्लेषण.
3. गोवंश हत्या कायदा – उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ संबंधित कायद्याचे सामाजिक व घटनात्मक विश्लेषण करतील.
4. जन सुरक्षा कायदा – युवा नेते संविधानाच्या चौकटीतून या कायद्याचे विश्लेषण करतील.
5. मस्जिदीवरील भोंगे – ऍड. खान सलीम खान यांचे सविस्तर मार्गदर्शन.
6. शहरांचा डी. पी. प्लॅन, गुंठेवारी कायदा १९९१, धार्मिक स्थळ कायदा, जमीन महसूल कायदा १९६६, एम.आर.टी.पी. कायदा – माजी सचिव, उच्च न्यायालयातील विधिज्ञ यांच्या सखोल आणि कायदेशीर मांडणीसह विश्लेषण.
वेळापत्रक:
सकाळी १०:३० ते १:०० – पहिलं सत्र
१:०० ते २:३० – जेवण व नमाज
२:३० ते ५:३० – दुसरं सत्र
कार्यशाळेच्या दोन्ही सत्रांचे अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दीकी (अध्यक्ष, मु.नु. काउंसिल) हे करतील.
ही माहिती मेअराझ सिद्दीकी (महासचिव, मु.नु. काउंसिल) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मस्जिद कमिट्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या ऐतिहासिक कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
🔍 समाजहितासाठी अभ्यास, संवाद आणि सजग सहभागाचं हे व्यासपीठ चुकवू नका!