मार्टी कृती समितीचा संघर्ष अखेर यशस्वी!अल्पसंख्यांकांसाठी 'मार्टि' संस्था अमलात; सल्लागार पदासाठी अर्ज मागवले

मार्टी कृती समितीचा संघर्ष अखेर यशस्वी!अल्पसंख्यांकांसाठी 'मार्टि' संस्था अमलात; सल्लागार पदासाठी अर्ज मागवले

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २६ जुलै :– राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या सशक्तीकरणासाठी गेल्या चार वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या मार्टी कृती समितीच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टि) ही संस्था प्रत्यक्षात कार्यान्वित होण्याच्या मार्गावर असून, शासनाने आता यासाठी सल्लागार पदासाठी अर्ज मागवले आहेत.

राज्य शासनाने २२ ऑगस्ट २०२४ रोजी मार्टि या संस्थेची अधिकृत घोषणा केली होती. बार्टी, सारथी, महाज्योती यांच्याप्रमाणे ही संस्था देखील अल्पसंख्यांकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर अभ्यास, संशोधन व प्रशिक्षणाचे काम करणार आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबामुळे कृती समितीने आंदोलन, निवेदनं, पत्रकार परिषद व विधिमंडळात सातत्याने पाठपुरावा केला.

या सर्व प्रयत्नांना आता यश लाभले असून, १० जून २०२५ रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार, सेवानिवृत्त अधिकाऱ्याची सल्लागार पदावर करार पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे.

➤ इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना आवाहन:

अर्ज अंतिम दिनांक: ३१ जुलै २०२५

अधिक माहिती: https://mdd.maharashtra.gov.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता: अल्पसंख्याक आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर

मार्टी कृती समितीच्या संघर्षाचे हे पहिले यश मानले जात असून, अल्पसंख्यांकांसाठी नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

👉 पुढील अपडेटसाठी वाचा – महाराष्ट्र वाणी न्यूज!