"महाविकास आघाडीची राज्यपालांकडे धाव; जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी"

"महाविकास आघाडीची राज्यपालांकडे धाव; जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी"
"महाविकास आघाडीची राज्यपालांकडे धाव; जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी"

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि १८ जुलै:- महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर निवेदन दिले.

महाविकास आघाडीने नुकतेच पारित झालेले ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा’ विधेयक जनतेच्या भावनांना धरून नसल्याचे सांगत, हे विधेयक मान्यता न देता शासनाकडे परत पाठवण्याची मागणी राज्यपालांकडे केली.

यासोबतच विधानभवनात सत्ताधाऱ्यांकडून अट्टल गुन्हेगारांना सोबत घेऊन येत विरोधकांवर दबाव टाकण्याचे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अशा सदस्यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात यावे, अशीही ठाम भूमिका महाविकास आघाडीने मांडली.

राज्यपाल महोदय हे दोन्ही विषय गांभीर्याने घेऊन योग्य कार्यवाही करतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार जयंत पाटील, आ.विजय वडेट्टीवार, आ.असलम शेख, आ.जितेंद्र आव्हाड, आ.डॉ. नितीन राऊत, आ. नाना पटोले, आ.सतेज बंटी पाटील, आ. अमीन पटेल, आ.साजिद पठाण आदी नेते उपस्थित होते.

 तुम्हाला काय वाटतं – जनसुरक्षा विधेयक योग्य आहे का? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा!