मतदारांचा स्पष्ट संदेश : घराणेशाहीला ठिकठिकाणी ‘ग्रीन सिग्नल’, तर अनेक ठिकाणी जोरदार ‘नकार’
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २३ :- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी राजकारणातील घराणेशाहीचा चेहरा पुन्हा एकदा ठळकपणे समोर आणला आहे. काही ठिकाणी नेतेमंडळींच्या नातलगांनी सत्ता हस्तगत केली, तर अनेक बड्या राजकीय घराण्यांना मात्र मतदारांनी स्पष्ट नकार दिला. या निकालांतून “आडनाव पुरेसे नाही, काम महत्त्वाचे” हाच संदेश जनतेने दिल्याचे चित्र दिसते.
🔶 घराणेशाहीचे विजयी उमेदवार
राज्यातील अनेक नगरपरिषद, नगरपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांचे नातलग विजयी झाले आहेत.
नंदुरबार : रत्ना रघुवंशी (शिंदे सेना) – आमदार रघुवंशी यांच्या पत्नी
दोंडाईचा : नयनकुंवर रावल (भाजप) – मंत्री रावल यांची आई
शिरपूर : चिंतन पटेल (भाजप) – माजी मंत्री अमरीश पटेल यांचा मुलगा
बुलढाणा : पूजा गायकवाड (शिंदेसेना) – आमदार संजय गायकवाड यांची पत्नी
खामगाव : अपर्णा फुंडकर (भाजप) – मंत्री आकाश फुंडकर यांची भावजयी
यवतमाळ : प्रियदर्शिनी उईके (भाजप) – मंत्री अशोक उईके यांची मुलगी
पुसद : मोहिनी नाईक (राष्ट्रवादी अजित पवार) – मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी
चंद्रपूर : अरुण धोटे (काँग्रेस) – माजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू
धामणगाव रेल्वे : अर्चना रोठे (भाजप) – आमदार प्रताप अडसर यांची भगिनी
चिखलदरा : अल्हाद कलोती (भाजप) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ
साकोली : देवश्री कापगते (भाजप) – माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांची सून
दुधनी : प्रथमेश म्हेत्रे (शिंदे सेना) – माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचे पुतणे
पंढरपूर : प्रणिती भालके (स्थानिक आघाडी) – आमदार भगीरथ भालके यांची पत्नी
अनगर : प्राजक्ता पाटील (भाजप) – माजी आमदार राजन पाटील यांची सून
अक्कलकोट : मिलन कल्याणशेट्टी (भाजप) – आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा भाऊ
जामनेर : साधना महाजन (भाजप) – मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी
चाळीसगाव : प्रतिभा चव्हाण (भाजप) – आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी
पाचोरा : सुनिता पाटील (शिंदेसेना) – आमदार किशोर पाटील यांची पत्नी
मुक्ताईनगर : संजना पाटील – आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या
सिल्लोड : समीर सत्तार (शिंदे सेना) – मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा
संगमनेर : मैथिली तांबे (आघाडी) – आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी
मुरगूड : सुहासिनी परदेशी (शिंदे सेना) – माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांची पत्नी
जयहसिंगपूर : संजय पाटील (आघाडी) – आमदार राजेंद्र पाटील यड्रवकर यांचा भाऊ
आष्टा : विशाल शिंदे (राष्ट्रवादी शप) – माजी आमदार विलासराव शिंदे यांचा मुलगा
कागल : सेहरनिदा मुश्रीफ (राष्ट्रवादी) – मंत्री हसन मुश्रीफ यांची सून
कुरुंदवाड : मनिषा डांगे (आघाडी) – माजी नगराध्यक्ष कुटुंबातील
देवळाली : सत्यजित कदम (भाजप) – चंद्रशेखर कदम यांचा मुलगा
श्रीरामपूर : करन ससाणे (काँग्रेस) – माजी आमदार ससाणे यांचा मुलगा
राहाता : स्वाधीन गाडेकर (भाजप) – वडील माजी नगराध्यक्ष
पाथर्डी : अभय आव्हाड (भाजप) – माजी आमदार बाबूजी आव्हाड यांचे पुत्र
गंगाखेड : उर्मिला केंद्रे (अजित पवार गट) – माजी मंत्री धनंजय मुंडे यांची बहीण
अंबेजोगाई : नंदकिशोर मुंदडा (आघाडी) – आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे
हिंगोली : रेखा बांगर (शिंदे सेना) – आमदार बांगर यांची वहिनी
🔻 घराणेशाहीचे पराभूत उमेदवार
मात्र अनेक ठिकाणी मोठ्या राजकीय घराण्यांनाही मतदारांनी सपशेल नाकारले.
रत्नागिरी : शिवानी सावंत (ठाकरे सेना) – माजी आमदार सुरेंद्र माने यांची सून
गडहिंग्लज : स्वाती कोरे (जनता दल) – माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची मुलगी
मुरगूड : तसनीम जमादार (राष्ट्रवादी शप) – माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांची पत्नी
संगमनेर : सुवर्णा खताळ (शिंदेसेना) – आमदार अमोल खताळ यांची वहिनी
फलटण : अनिकेत निंबाळकर (राष्ट्रवादी शप) – माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे पुत्र
भुसावळ : रजनी सावकारे (भाजप) – मंत्री संजय सावकारे यांची पत्नी
पंढरपूर : श्यामल शिरसाट (भाजप) – माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी
राजकीय विश्लेषण
या निकालांमधून स्पष्ट होते की काही ठिकाणी परंपरा, ओळख आणि संघटनशक्ती कामी आली, तर अनेक ठिकाणी केवळ नातेसंबंधांवर आधारित उमेदवारी मतदारांनी फेटाळली. त्यामुळे आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हे निकाल पक्षांसाठी गंभीर इशारा मानले जात आहेत.
अंतिम निष्कर्ष : घराणं असो वा नसो, शेवटी मतदाराला काम, विश्वास आणि स्थानिक नेतृत्वच हवं आहे!– आणि हाच संदेश या निवडणुकांनी ठासून दिला आहे.