पेन्शनच्या अडचणींसाठी २५ नोव्हेंबरला पेन्शन अदालत! जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित प्रकरणांचा होणार निपटारा.

पेन्शनच्या अडचणींसाठी २५ नोव्हेंबरला पेन्शन अदालत! जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित प्रकरणांचा होणार निपटारा.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २० :- निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनविषयक समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. महालेखापाल कार्यालय, नागपूर आणि वरिष्ठ कोषागार कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत विशेष कार्यशाळा होणार आहे. यामध्ये ई-पीपीओ (E-PPO), ओजीआरएस (OGRS), लाइव्ह केस स्टेटस ट्रॅकिंग आणि पेन्शनर्स समाधान या नवीन उपक्रमांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेला सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत पेन्शन अदालत भरविण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर कोषागारामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांच्या तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणी ऐकून त्यांचे निराकरण केले जाणार आहे. विशेषतः महालेखापाल स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा परस्पर समन्वयातून निपटारा करण्यावर भर दिला जाणार आहे.

निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाचे आवाहन

संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या पेन्शनशी संबंधित आवश्यक कागदपत्रे व अभिलेख सोबत घेऊन २५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन वरिष्ठ कोषागार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित