पारस रेल्वे स्थानकावर शालिमार व नाशिक मेमो गाड्यांना थांबा द्या – वंचित बहुजन आघाडीची रेल्वे प्रशासनाला ठणकावणी

पारस रेल्वे स्थानकावर शालिमार व नाशिक मेमो गाड्यांना थांबा द्या – वंचित बहुजन आघाडीची रेल्वे प्रशासनाला ठणकावणी
पारस रेल्वे स्थानकावर शालिमार व नाशिक मेमो गाड्यांना थांबा द्या – वंचित बहुजन आघाडीची रेल्वे प्रशासनाला ठणकावणी

महाराष्ट्र वाणी न्युज 

अकोला(प्रतीनीधी) दि ३ जुलै :– कोरोना काळात थांबा बंद झालेल्या शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (१८०३०) व नाशिक-बडनेरा मेमो एक्सप्रेस (०१२११) या गाड्यांना पारस रेल्वे स्टेशनवर पुन्हा थांबा देण्यात यावा, अशी जोरदार मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. आम्रपालीताई खंडारे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ रेल्वे विभागाच्या मंडल रेल्वे प्रबंधक (डीआरएम) इति पांडे मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पारस स्टेशनचे प्रबंधक यांच्यामार्फतही मागणीचा ठराव सादर करण्यात आला.

३० हजार लोकसंख्या आणि औष्णिक केंद्र, तरीही सुविधा नाही!

पारस गावाची लोकसंख्या सुमारे ३० हजार, शिवाय औष्णिक विद्युत केंद्र येथे कार्यरत असल्याने अनेक कर्मचारी दररोज रेल्वेने प्रवास करतात. तसेच, जिल्हा ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. पूर्वी शालिमार एक्सप्रेसचा पारस येथे थांबा होता, पण कोरोना काळात तो बंद करण्यात आला. आजही हा थांबा पुन्हा सुरू न झाल्यामुळे स्थानिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मोठ्या संख्येने लोक उपस्थित, तीव्र आंदोलनाचा इशारा

या निवेदनप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व पारस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये योगिता शेलार, उषा शेलार, अंजना सावदेकर, सुमन परसोडे, युनुस सेठ, खुर्शिद राणा, अश्विन खंडारे सर, गणेश लांडे, राहुल खंडारे, विलास इंगळे गुरुजी, मनोज खंडारे, सागर नाटेकर, तेजस मोरे यांचा सहभाग होता.

"थांबा न दिल्यास तीव्र आंदोलन!" – वंचित बहुजन आघाडीचा इशारा

रेल्वे प्रशासनाने स्थानिक जनतेच्या भावना ओळखून शालिमार एक्सप्रेस आणि नाशिक मेमो गाड्यांना पारस येथे तात्काळ थांबा द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

 जनतेच्या सोयीसाठी थांबा हवा – अन्यथा लढा उग्र होणार!