नासेर नजीर खान यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापराव पाटील यांची सदिच्छा भेट; अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य सत्कार!

नासेर नजीर खान यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापराव पाटील यांची सदिच्छा भेट; अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य सत्कार!
नासेर नजीर खान यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापराव पाटील यांची सदिच्छा भेट; अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य सत्कार!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापराव पाटील यांनी आज काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नासेर नजीर खान यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी अल्पसंख्याक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मिळविलेल्या दणदणीत विजयाबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी डॉ. प्रतापराव पाटील यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पदवीधर मतदारांच्या विश्वासाला न्याय देत शिक्षण, बेरोजगारी, युवकांचे प्रश्न तसेच मराठवाड्यातील विविध प्रलंबित प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे वाचा फोडावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

या सदिच्छा भेटीदरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. पाटील यांच्याशी विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर संवाद साधला. त्यांच्या विजयामुळे मराठवाड्यातील पदवीधरांच्या प्रश्नांना विधान परिषदेत सक्षम नेतृत्व मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी अल्पसंख्याक काँग्रेसचे राष्ट्रीय पदाधिकारी नासेर नजीर खान, ॲड. विशाल कदम, अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनीस पटेल, अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, मोहित जाधव, ओसामा नासेर खान, बाबा बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. प्रतापराव पाटील यांच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे काँग्रेस पदाधिकारी आणि नवनिर्वाचित आमदार यांच्यातील संवादाला एक सकारात्मक व्यासपीठ मिळाले.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित