नागरिकांनी "एक गाव एक गणपती"संकल्पनेनुसार शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात उत्सव साजरा करावा" _पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि, २१ :- राज्य शासनाने या वर्षापासून गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करताना "एक गाव एक गणपती" या संकल्पनेनुसार गणेश मंडळांनी पुढाकार घेऊन ही संकल्पना अंमलात आणावी.शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद तसेच इतर उत्सव साजरे करावेत. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी आज शांतता समन्वय समितीच्या बैठकीत केले.
एमजीएम महाविद्यालयातील आईन्स्टाईन सभागृहात जिल्हास्तरीय शांतता समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह , निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांच्यासह जिल्ह्यातील विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य,सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.
गणेश उत्सव साजरा करत असताना विविध विधायक गोष्टीचा अवलंब करत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी सहकार्य करावे. राज्य उत्सव म्हणून गणेश उत्सव यावर्षीपासून साजरा होत आहे ,यामुळे बाहेरच्या राज्यातील तसेच इतर देशातील नागरिक या उत्सवाच्या कालावधीमध्ये भेट देत असतात. उत्सव कालावधी मधील शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात हा राज्य महोत्सव सर्व स्तरावर चांगल्या उपक्रमाने साजरा व्हावा यासाठी गणेश मंडळातील पदाधिकारी ,प्रशासन, नागरिक यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
समाज माध्यमाचा विधायक गोष्टीसाठी वापर करून समाजामध्ये शांतता ,व चांगल्या उपक्रमाची दखल घ्यावी, यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम एक्स याच्या माध्यमातून चांगल्या उपक्रमाच्या रील प्रसार ित केले तर समाजामध्ये जागरूकता निर्माण सायबर गुन्हेगारी पासून संरक्षणासाठीचे उपाययोजना याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. डीजे चा वापर करू नये.
जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त सह,सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जाणार आहे. त्याचप्रमाणे ठीक ठिकाणी ध्वनी प्रदूषण मापनयंत्र बसविले आहे, उच्च पातळीवरील आवाजाचे डीजे किंवा स्पीकर इतर वाद्याचा उपयोग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
गणेशोत्सव कालावधी दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा.स्पर्धा परीक्षा, विविध सांस्कृतिक स्पर्धा, निबंध स्पर्धा यासारखे उपक्रम गणेश मंडळांनी राबवावेत, उत्कृष्ट संकल्पनेचे सादरीकरण स्पर्धेमध्ये पाठवावे यातून शासनामार्फत गणेश मंडळांनाही पुरस्कार दिले जाणार आहेत यासाठी अभिनव संकल्पनेतून विविध शासकीय योजना, उपक्रम ,समाज उपयोगी उपक्रमाची अंमलबजावणी गणेश उत्सव कालावधीमध्ये गणेश मंडळाने करावी, असे शांतता समन्वय समितीच्या बैठकीत सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करावा. विद्यार्थ्यांना व नव्या पिढीला चांगल्या गोष्टी शिकवण्याची गरज असून यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन या गणेशोत्सव कालावधीमध्ये करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंखे यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या दरम्यान स्पर्धा परीक्षा सारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमाचे आयोजन गणेश उत्सवात गावागावातील गणेश मंडळांनी करावे. शांतता समन्वय समितीच्या प्रस्ताविकात अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी जिल्ह्यामध्ये 511 गावांमध्ये "एक गाव एक गणपती" ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची सांगितले. त्याचप्रमाणे 1650 सार्वजनिक गणेश मंडळ जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे.गणेशोत्सव दरम्यान ड्रोन पेट्रोलिंग द्वारे ही कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिस प्रशासनाकडून वापर केला जाणार असल्याचे सांगितले. शांतता समितीचे सदस्य अजिंठा येथील दुर्गाताई पवार, ,सिल्लोडचे नामदेवराव चाफे,खुलताबादचे अभी जागीरदार, पैठणचे कलीम करीम पठाण या सर्वनी गणेश उत्सव शांततेत साजरा करण्याची ग्वाही समिती सदस्यांनी दिली.