जिल्ह्यात नगरपरिषद मतदान शांततेत पार; ६ नगरपरिषदांचा एकूण मतदान टक्का 74.70%

जिल्ह्यात नगरपरिषद मतदान शांततेत पार; ६ नगरपरिषदांचा एकूण मतदान टक्का 74.70%
जिल्ह्यात नगरपरिषद मतदान शांततेत पार; ६ नगरपरिषदांचा एकूण मतदान टक्का 74.70%

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३ :- जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडल्या. सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत जिल्हाभरातील मतदान केंद्रांवर मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला लोकशाहीचा हक्क बजावला. ग्रामीण पोलिसांनी केलेल्या चोख बंदोबस्तामुळे संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.

जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांची अंतिम अधिकृत मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे—

खुल्ताबाद नगरपरिषद – 82.26% (जिल्ह्यात सर्वाधिक)

कन्नड नगरपरिषद – 76.83%

सिल्लोड नगरपरिषद – 74.51%

पैठण नगरपरिषद – 73.74%

वैजापूर नगरपरिषद – 73.30%

गंगापूर नगरपरिषद – 71.76%

जिल्हाभरातील एकूण मतदानाचा सरासरी टक्का 74.70% नोंदवण्यात आला आहे.

आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून, २१ डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.