जन्म दाखले प्रकरण : किरीट सोमय्या च्या दबावाने निर्दोषांवर खोटे गुन्हे – एकता संघटनेचा तीव्र निषेध
जळगाव, दि. ८ सप्टेंबर –
शहरातील जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात ४३ निरपराध नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप जळगाव जिल्हा एकता संघटनेने केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या राजकीय दबावाखाली पोलिसांनी ही कारवाई केली असून, याचा एकता संघटनेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, तपासात स्पष्ट झाले आहे की आरोपी ठरवलेले नागरिक हे सर्वसामान्य असून त्यांनी कोणतीही बनावट कागदपत्रे तयार केलेली नाहीत. काही वकिल आणि एजंट यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे हे प्रकरण उभे राहिले. तरीसुद्धा निर्दोष नागरिकांवर गुन्हे दाखल करून मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक त्रास देण्यात येत आहे.
एकता संघटनेच्या ठाम मागण्या :
1️⃣ निर्दोष ४३ नागरिकांवरील सर्व खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.
2️⃣ या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी व्हावी.
3️⃣ निर्दोष नागरिकांचा छळ थांबवून त्यांना न्याय द्यावा.
4️⃣ राजकीय दबाव टाकणाऱ्या नेत्यांवर कारवाई करावी.
संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी इशारा दिला की, प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन उभारले जाईल.
शिष्टमंडळात सहभागी – मुफ्ती खालिद, हाफिज रहीम पटेल, फारुक शेख, अनिस शाह, मतीन पटेल, मौलाना गुफरान शेख, बबलू पटेल, आरिफ देशमुख, सय्यद जमील, रजाक पटेल, रहिमिद्दीन आदींचा समावेश होता.
📷 फोटो कॅप्शन – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन सादर करताना आरिफ देशमुख, मुफ्ती खालिद, फारुक शेख व शिष्टमंडळ.