जनगणना २०२७ प्रशिक्षण! जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

जनगणना २०२७ प्रशिक्षण! जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी
जनगणना २०२७ प्रशिक्षण! जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर,(औरंगाबाद)दि.९ :- जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. जनकल्याणाच्या विविध योजना राबवितांना जनगणनेमुळे प्राप्त माहितीचा वापर केला जातो. अशा या जनगणनेचे काम हे कर्तव्य भावनेने करावे व आपला सक्रीय सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना केले.

 जनगणना २०२७ अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जनगणना कर्मचाऱ्यांचे घरयादी गणना करुन गट तयार करण्याबाबत प्रशिक्षण पार पडले. जिल्हाधिकारी कार्यालय, विविध शासकीय कार्यालये, नगरपालिका, तहसिल कार्यालये येथील कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला.

 निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य संगिता राठोड, प्रशिक्षण देण्यासाठी आलेले जनगणना संचालनालयाचे सहा.संचालक प्रवीण भगत, जनगणना निरीक्षक अरुण साळगावकर, तज्ज्ञ व्यक्ती रामदास मंडाले आदी उपस्थित होते. 

*दोन टप्प्यात होणार जनगणना*

  जनगणना २०२७ ही दोन टप्प्यात होत आहे. त्याती पहिला टप्पा घराची यादी तयार करुन त्याचे गट तयार करणे हा असून हा टप्पा एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पार पाडला जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष जनगणना फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरु होईल. यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही जनगणना ही संपूर्ण डिजीटल असेल. त्यात स्वगणनेचे म्हणजेच स्वतः नागरिकांना आपली माहिती ऑनलाईन भरता येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ओळखक्रमांक (आयडी) तयार होणार आहे. अर्थात ही भरलेली माहिती स्वतः जनगणना कर्मचारी येऊन पडताळणी ही करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील श्रीमती उर्मिला धारुरकर यांनी सूत्रसंचालन केले.