घनकचरा संकलनासाठी 380 घंटागाड्यांचे विशेष डिझाईन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २ : महानगरपालिकेच्या हद्दीत घनकचरा संकलन व वाहतूक सेवेसाठी Western Imaginary Transcon Pvt. Ltd. या कंपनीला निविदा प्रदान करण्यात आलेली आहे. या सेवेसाठी कंपनीकडून एकूण 380 घंटागाड्या कचरा संकलनासाठी वापरण्यात येणार आहेत.
घंटागाड्यांच्या डिझाईनबाबत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण व सूक्ष्म सूचना केल्या होत्या. नागरिकांना सहज ओळखता येईल, स्वच्छता जनजागृतीला चालना मिळेल तसेच कार्यक्षमतेत वाढ होईल, या दृष्टीने डिझाईन करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या.
आयुक्तांच्या संकल्पनेनुसार व मार्गदर्शनानुसार सदरील घंटागाड्यांचे डिझाईन अंतिम करण्यात आले असून, त्या लवकरच शहरातील कचरा संकलन सेवेत कार्यरत करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध व नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.