गंगाखेडच्या दहिफळे बंधूंची 'माणुसकीची वाटणी' – शेती करणाऱ्या भावाला दिला मोठा हिस्सा, राज्यभरातून होतंय कौतुक!

गंगाखेडच्या दहिफळे बंधूंची 'माणुसकीची वाटणी' – शेती करणाऱ्या भावाला दिला मोठा हिस्सा, राज्यभरातून होतंय कौतुक!

महाराष्ट्र वाणी न्युज 

गंगाखेड (परभणी) दि ४ जुलै:- गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथे दहिफळे कुटुंबाने शेतीच्या वाटपात आदर्श निर्माण केला आहे. प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. बाळासाहेब दहिफळे आणि प्रा. युवराज दहिफळे या दोघा भावांनी आई-वडिलांच्या आशीर्वादाला महत्व देत स्वतःच्या वाट्यात कमी हिस्सा घेऊन संपूर्ण शेतीची जबाबदारी घेत असलेल्या आपल्या तिसऱ्या भावाला – केशव दहिफळे याला अधिक जमीन दिली.

एकूण १६ एकर शेतीपैकी प्रा. बाळासाहेब आणि प्रा. युवराज यांनी प्रत्येकी केवळ ३.५ एकर हिस्सा घेतला, तर केशव यांना तब्बल ९.५ एकर जमीन दिली. याशिवाय गावातील घर आणि भूखंड देखील केशव यांच्या नावे करण्यात आले. वडील रंगनाथराव दहिफळे यांच्या मार्गदर्शनात आणि उपस्थितीत ही वाटणी पार पडली.

या निर्णयामुळे केवळ कुटुंबातच नव्हे तर संपूर्ण गावात आणि परिसरातही माणुसकी, एकोप्याचा आणि समजुतदारपणाचा आदर्श उभा राहिला आहे. राज्यभरातून या वाटणीचे कौतुक होत असून, अनेकांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.

समजुतीची वाटणी – माणुसकीची शिकवण!