"कुरेशी समाजाची मागणी केंद्रापर्यंत; केंद्रीय मंत्री गडकरींकडे निवेदन, बुधवारी बैठक निश्चित"

"कुरेशी समाजाची मागणी केंद्रापर्यंत; केंद्रीय मंत्री गडकरींकडे निवेदन, बुधवारी बैठक निश्चित"

महाराष्ट्र वाणी न्युज 

नागपूर दि ९ ऑगस्ट :- पशु ट्रान्सपोर्ट संदर्भातील आरटीओ नियम शिथिल करण्याच्या मागणीसाठी गेले दोन महिने महाराष्ट्रातील कुरेशी समाज व पशु व्यापारी हरताळावर आहेत. त्यांचा व्यवसाय थेट अडचणीत आणणारे नियम शिथिल व्हावेत, यासाठी महाराष्ट्र पशुव्यवसायिक व कृषी समाज संघर्ष समितीच्या वतीने आज (9 ऑगस्ट 2025) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर येथे शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.

या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत गडकरी साहेबांनी येत्या बुधवारी केंद्रीय सचिवालयात शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री गडकरी साहेब कुरेशी समाजाला न्याय देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या वेळी उपस्थित होते – महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान, हाजी इसा कुरेशी (औरंगाबाद), कलीम कुरेशी, हाजी शाम्मू कुरेशी (नागपूर), सलीम कुरेशी, अ‍ॅड. वसीम बिस्मिल्लाह कुरेशी आदी मान्यवर.

— महाराष्ट्र वाणी