कचोरीत उंदराच्या लेंड्या आढळल्याची तक्रार; वैजापूरच्या ‘भवानी स्वीट’वर FDAची कारवाई, दुकान सील

कचोरीत उंदराच्या लेंड्या आढळल्याची तक्रार; वैजापूरच्या ‘भवानी स्वीट’वर FDAची कारवाई, दुकान सील
कचोरीत उंदराच्या लेंड्या आढळल्याची तक्रार; वैजापूरच्या ‘भवानी स्वीट’वर FDAची कारवाई, दुकान सील

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २४ :- वैजापूर शहरातील ‘भवानी स्वीट’ या मिठाई दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने कारवाई करत दुकान सील केले आहे. या दुकानातून खरेदी केलेल्या कचोरीमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर FDAच्या पथकाने दुकानाची तपासणी केली.

तपासणीदरम्यान दुकानात आवश्यक अन्न व्यवसाय परवाना नसतानाही खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. याशिवाय अन्न व्यवसायासाठी लागू असलेल्या Schedule-4 मधील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेशी संबंधित नियमांचे पालन होत नसल्याचेही आढळले.

खाद्यपदार्थांची स्वच्छता, सुरक्षितता आणि हाताळणीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यानंतर FDAने दुकानाविरोधात कारवाई करत ते सील केले.

या कारवाईनंतर वैजापूर शहरातील खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन कितपत केले जाते, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.