ऑल इंडिया उलेमा बोर्ड मुतवल्ली विंगच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती; शकीला पठाण मराठवाडा अध्यक्षा

ऑल इंडिया उलेमा बोर्ड मुतवल्ली विंगच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती; शकीला पठाण मराठवाडा अध्यक्षा
ऑल इंडिया उलेमा बोर्ड मुतवल्ली विंगच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती; शकीला पठाण मराठवाडा अध्यक्षा

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ७ :- ऑल इंडिया उलेमा बोर्ड मुतवल्ली विंगच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सिडकोतील मोतीवाला नगर येथे पार पडला. राष्ट्रीय अध्यक्ष शेख फैसल मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या वेळी प्रसिद्ध समाजसेविका मोहतरमा जाकिरा नाजे खान पठाण ऊर्फ शकीला पठाण यांची मुतवल्ली विंगच्या मराठवाडा अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच औरंगाबाद शहर अध्यक्ष म्हणून मांडविया सीमा मोहम्मद शकील, तर उपाध्यक्षपदी अहमद मोहम्मद अली खान यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शेख फैसल मुजावर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गुलपोशी करण्यात आली.

यावेळी बोलताना शेख फैसल मुजावर म्हणाले की, महाराष्ट्र व औरंगाबाद परिसरातील वक्फ जमिनींच्या संरक्षणासाठी मुतवल्ली विंगची स्थापना करण्यात आली आहे. रेल्वे मालमत्तेनंतर देशात वक्फ मालमत्ता दुसऱ्या क्रमांकावर असून, या जमिनींचा योग्य वापर झाल्यास मुस्लिम समाजातील कोणताही नागरिक भुकेला किंवा बेरोजगार राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वक्फ बोर्डाच्या जमिनींचे संरक्षण, अतिक्रमण हटवणे तसेच मुतवल्ली, ट्रस्टी, मदरसे, कब्रस्तान, दर्गा, मशिदी, यतीमखाने आदी वक्फ प्रकरणांतील अडचणी लोकशाही मार्गाने सोडवून न्याय मिळवून देण्याचे काम मुतवल्ली विंग करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या शेवटी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शेख फैसल मुजावर यांची गुलपोशी करून आभार मानले.

या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष (वक्फ विंग) शेख आसिफ, जिल्हाध्यक्ष अशरफ पठाण, सैयद मुजीब, सिद्धार्थ ढाले, सैय्यद याकूब मुतवल्ली, अय्यूब पठाण, नाजे पठाण, अनीस रामपुरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचत राहा ‘महाराष्ट्र वाणी’ – सत्य बातमीचा विश्वास!