ऑनलाइन खत वितरण प्रणालीतील त्रुटी दूर करा; भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते कृषिमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १० :- राज्यातील शेतकऱ्यांना खत खरेदी करताना ऑनलाइन वितरण प्रणालीमधील तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने या त्रुटी तातडीने दूर करून खत वितरण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी Dattatraya Bharane यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
खंबायते यांनी दिलेल्या निवेदनात सध्याच्या ऑनलाइन खत वितरण प्रणालीमुळे अनेक शेतकऱ्यांना खत खरेदी करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केले. यामुळे खत वितरणात विलंब होत असून शेतीच्या कामांवर त्याचा परिणाम होत आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे तसेच भाजप जिल्हा सचिव राजेश बनकर पाटील उपस्थित होते.
शेतकऱ्यांना हंगामाच्या काळात वेळेवर आणि सुरळीत खत उपलब्ध व्हावे, यासाठी ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी तातडीने दूर करून आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
वाचत रहा महाराष्ट्र वाणी – आपल्या हक्काच्या बातम्यांसाठी!