उस्मानपुरा मनपा शाळेत विद्यार्थ्यांसाठी हॅण्ड वॉश स्टेशन व वॉशरूमचे लोकार्पण; लुपिनच्या CSR उपक्रमाचे कौतुक
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), दि. २५ :-
लुपिन फाउंडेशनच्या CSR निधीतून मनपा प्राथमिक विद्यालय, उस्मानपुरा येथे विद्यार्थ्यांसाठी हॅण्ड वॉश स्टेशन आणि वॉशरूमची उभारणी करण्यात आली असून, या सुविधांचे उद्घाटन महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती शोभा बुरांडे, नगरसेविका शिल्पा वाडकर, मनपा उपायुक्त अंकुश पांढरे, लुपिन कंपनीचे प्लांट हेड विष्णुदास असावा, व्यंकटेश शेट्टी, पूजा जैन, विकास ढवळे, बाळासाहेब गर्जे, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर सांगळे, प्रशासन अधिकारी संजीव सोनार, विस्तार अधिकारी विजय कोल्हे, रईसा बेगम तसेच मुख्याध्यापक शशिकांत उबाळे आणि बाळा जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महापौर समीर राजूरकर यांनी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल लुपिन कंपनीचे आभार मानले. तसेच महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांची उभारणी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी कंपनीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय शहरात येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ आणि आकर्षक शहर दिसावे यासाठी महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी सौंदर्यीकरणाची कामे सुरू असल्याचे सांगत, या उपक्रमातही लुपिन कंपनीने सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शहर विकासात सामाजिक सहभागाची नवी पायरी उभारत, CSR उपक्रमातून विद्यार्थ्यांसाठी उभ्या राहत आहेत अधिक चांगल्या सुविधा...!