अहमदाबाद विमान दुर्घटना : एक क्षणात दोन पिढ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त!

महाराष्ट्र वाणी न्युज
अहमदाबाद | १२ जून :- आज दुपारी गुजरातमधील अहमदाबाद येथून लंडनकडे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानात २३२ प्रवासी आणि १० क्रू मेंबर्स सवार होते. टेकऑफनंतर काही वेळातच हे विमान कोसळले आणि सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
या हृदयद्रावक दुर्घटनेची सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे — विमान ज्या ठिकाणी कोसळले, ती जागा एका एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलची होती. देशाचे भावी डॉक्टर आपल्या अभ्यासात मग्न असताना मृत्यूने त्यांच्यावर आघात केला.
या अपघातात केवळ परदेशात जाणारेच नव्हे, तर देशासाठी घडणारे अनेक भविष्यकाळ उद्ध्वस्त झाले आहेत. एक क्षणात अनेक स्वप्नं विरून गेली, मातांच्या आशा मावळल्या, आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला.
ईश्वर सर्व दिवंगत आत्म्यांना शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो.
आजचा दिवस आपल्याला शिकवून गेला — आयुष्य कधीही बदलू शकतं…
म्हणून प्रत्येक क्षण जगा आणि आपल्या माणसांना जपा.
#अहमदाबादविमानअपघात #राष्ट्रीयशोक #RIP #IndianDoctors #PlaneC
rashTragedy