‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ उपक्रमाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबरला उद्घाटन - मंत्री मंगल प्रभात लोढा

‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ उपक्रमाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबरला उद्घाटन - मंत्री मंगल प्रभात लोढा

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि ६ :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे युवकांना उद्योग सुसंगत आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे, अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या उपक्रमाअंतर्गत राज्यभरात ६०० ठिकाणी उद्घाटन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, या ठिकाणी विश्‍वकर्मा समाजातील कारागीर, स्थानिक कलाकार व पारंपरिक व्यवसायातील तज्ज्ञ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाईल. यामधून त्यांच्या कौशल्याला सन्मान मिळेल आणि समाजातील पारंपरिक कौशल्यांविषयी आदरभाव वाढेल, असे लोढा यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा शासकीय तांत्रिक विद्यालयात संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

🔹 महाराष्ट्र वाणी — कौशल्याला नवी दिशा, रोजगाराला नवे दार!