अखेर पाठपुराव्याला यश! आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नांना फळ – खुलताबादेत ट्रामा केअर युनिटसाठी १३ कोटी निधी मंजूर
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई, खुलताबाद दि २८ :- खुलताबादकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या ट्रामा केअर युनिटसाठी अखेर निधी मिळाला आहे. आमदार सतीश चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक योजनेतून १३ कोटी ८ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
२६ डिसेंबर २०२२ रोजी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर २० जुलै २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित झाला. मात्र निधीची अडचण असल्याने काम थांबले होते. यासाठी आमदार चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून डीपीडीसीमार्फत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
शेवटी खुलताबादकरांचा जीवघेणा प्रश्न सोडवला गेला आहे. या निर्णयामुळे अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने आधुनिक वैद्यकीय सेवा मिळणार असून तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आमदार सतीश चव्हाण यांनी या निधी मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री संजय शिरसाठ यांचे आभार मानले आहेत.
👉 खुलताबादकरांसाठी ही नवी सुविधा म्हणजे जीव वाचवणारा संजीवनी ठरणार आहे!