अंभई गावची मागणी : सुमय्या मदरशाला ३० लाखांचा निधी मंजूर करावा! खासदार डॉ. कल्याण काळेंना निवेदन

अंभई गावची मागणी : सुमय्या मदरशाला ३० लाखांचा निधी मंजूर करावा! खासदार डॉ. कल्याण काळेंना निवेदन
अंभई गावची मागणी : सुमय्या मदरशाला ३० लाखांचा निधी मंजूर करावा! खासदार डॉ. कल्याण काळेंना निवेदन

महाराष्ट्र वाणी न्युज 

सिल्लोड, अंभई दि २६ :- मौजे अंभई येथील सुमय्या अरबी मदरशामध्ये सध्या ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी तातडीने सुविधा उभारण्याची गरज आहे. यासाठी मदरशाच्या प्रतिनिधींनी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याणराव काळे यांच्याकडे दिनांक २५ ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे निधी मंजुरीची मागणी केली आहे.

या निवेदनात मदरशाकडे जाणाऱ्या गोळेगाव-अंभई रस्त्यापासून सुमारे १०० मीटर सिमेंट काँक्रीट रस्ता बांधण्यासाठी १० लाख रुपये आणि मदरसा समोरील वालकंपाऊंडमध्ये पेवर ब्लॉक व सुशोभीकरणासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत अंभईच्या माध्यमातून खासदारांना देण्यात आलेल्या या निवेदनावर नसीब मौलाना, हाफीज असद सुभाण खा, शेख साजेद व कैसर आझाद यांनी स्वाक्षरी केली आहे. गावकऱ्यांचा विश्वास आहे की, हा निधी मंजूर झाल्यास परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि शैक्षणिक वातावरण अधिक सुशोभित होईल.

– महाराष्ट्र वाणी