अंभईच्या मोहसीन अब्दुल हलीम देशमुख यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड!
पालकमंत्री संजय शिरसाट व आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून अभिनंदन; नव्या जबाबदारीसाठी दिल्या शुभेच्छा
सिल्लोड/ अंभई दि २६ :- तालुक्यातील अंभई येथील मोहसीन अब्दुल हलीम देशमुख यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सामाजिक न्याय विभागाचे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या निवडीमुळे अंभई परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, देशमुख यांच्यावर आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील विश्वासार्ह दुवा म्हणून मोहसीन अब्दुल हलीम देशमुख यांनी काम करावे. त्यांच्या माध्यमातून जनतेची कामे अधिक गतीने आणि पारदर्शकपणे मार्गी लागावीत. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मिळालेली ही जबाबदारी जनसेवेची नवी संधी असून, सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी देशमुख यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे मोहसीन अब्दुल हलीम देशमुख यांच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
अंभई येथील रामदास मारोती दुतोडे, सय्यद उमर अहेमदअली, शरीफ हकीम देशमुख, जफर आशकअली सय्यद, मुसा खाजु शाह व वाजेद नसीब पठाण यांची सुद्धा विषेश कार्यकारी अधिकारी निवड झाली आहे
हि निवड सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या वतीने करण्यात आली आहे यासर्वांचे आमदार अब्दुल सत्तार यांनी अभीनंदन केले आहे