“६.२५ कोटींचा निधी मंजूर, पण मार्टि योजना अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत”
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ३० :– महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी “महाराष्ट्र अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टि)” स्थापन केली असून या संस्थेसाठी तब्बल ६.२५ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात या संस्थेच्या योजना अद्याप सुरू झालेल्या नाहीत.
दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती व इतर समाजांसाठी कार्यरत असलेल्या बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती, आर्टी यांसारख्या संस्थांमार्फत सर्वंकष धोरण राबवले जात आहे. तसेच या संस्थांच्या माध्यमातून CET व विविध स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी विशेष प्रशिक्षण सुरु आहे.
याच धर्तीवर अल्पसंख्याक समाजासाठीही समान संधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. “योजना आहे पण अंमलबजावणी बाकी आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी ‘मार्टि’च्या योजनांची अंमलबजावणी त्वरेने व्हावी,” अशी मागणी ॲड. अझर पठाण, मार्टि कृती समिती यांनी केली आहे.
“विकासाची वाट सर्वांसाठी समान – आता ‘मार्टि’ योजनेला गती देणे काळाची गरज!”