स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका: प्रमुख प्रचारकांची मर्यादा दुप्पट; २० ऐवजी आता ४० जणांना परवानगी!
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि ८ :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून नेमण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांची (Star Campaigner) संख्या आता दुप्पट करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ही मर्यादा २० वरून वाढवून ४० पर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे.
ही मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोगाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत केली होती. त्यानुसार, ‘महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, २०२५’ मधील परिच्छेद २६ नुसार आयोगाने सुधारित आदेश जारी केला आहे.
यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला ४० प्रमुख प्रचारकांची यादी सादर करण्याची मुभा असेल. संबंधित यादी त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करावी लागेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
🔸 स्थानिक राजकारणाचा रंग आणखी गडद होण्याची चिन्हे!