सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी कटिबद्ध! आसाडी येथे भाजप भवन मंडळाची चौकसभा उत्साहात पार

सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी कटिबद्ध! आसाडी येथे भाजप भवन मंडळाची चौकसभा उत्साहात पार
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी कटिबद्ध! आसाडी येथे भाजप भवन मंडळाची चौकसभा उत्साहात पार

महाराष्ट्र वाणी न्युज 

आसाडी (ता. सिल्लोड) दि २१ जून :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारने ११ यशस्वी वर्षे पूर्ण केली आहेत. ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या त्रिसूत्रीवर चालणाऱ्या या सरकारच्या कार्यकाळात देशाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे.

या निमित्ताने "विकसित भारताचा अमृत काळ" या अभियानाअंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या भवन मंडळातर्फे आसाडी (ता. सिल्लोड) येथे भव्य चौकसभेचे आयोजन करण्यात आले. सदर सभा उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.

या प्रसंगी भाजप नेते सुरेश बनकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील मोठे, भवन मंडळ तालुकाध्यक्ष एकनाथ हिवाळे, कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब उबाळे, सरपंच सुधाकर मिरगे, विठ्ठल येडूबा मिरगे, तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर मेटे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सांडूबाबा सुरडकर, व्हाईस चेअरमन रंगनाथ मिरगे, विजय शिरसाट, कैलास सुरडकर, रघुनाथ करपे, साहेबराव मिरगे, अण्णा साहेबराव मिरगे, विष्णू मेटे, रघुनाथ वावधने, दादा महाजन, दादाराव मिरगे यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सभेमध्ये वक्त्यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि आगामी काळात भाजप अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामीण स्तरावर भाजपा कार्यकर्त्यांच्या संघटनबांधणीला चालना देणाऱ्या अशा उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवे ऊर्जा संचारली.