सिल्लोडमध्ये काँग्रेसकडून निवडणुकीची रणधुमाळी सुरू; डॉ. जफर अहमद खान यांच्या उपस्थितीत फॉर्म वितरण कार्यक्रम पार पडला
महाराष्ट्र वाणी 🗞️
सिल्लोड दि ३ :- आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिल्लोडमध्ये आज काँग्रेस पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तसेच सिल्लोड विधानसभा निरीक्षक डॉ. जफर अहमद खान साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे अधिकृत नामांकन फॉर्म वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे महासचिव शेख कैसर आजाद, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भास्करराव घायवट, सिल्लोड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख फेरोज, माजी नगरसेवक अग्रवाल साहेब, आवेस कैसर आजाद, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अंभोरेताई आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. जफर अहमद खान यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “काँग्रेस पक्ष हा सामान्य जनतेचा आवाज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जनतेच्या अडचणींवर तोडगा काढणे आणि विकासाचा मार्ग मोकळा करणे हीच आमची भूमिका आहे.”
या वेळी पक्षाचे फॉर्म कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आले आणि निवडणूक नियोजनासंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले. सिल्लोड तालुक्यातील विविध विभागांतील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सिल्लोडमध्ये काँग्रेसची तयारी जोरात – विकास आणि जनतेच्या प्रश्नांवर भर देण्याचा निर्धार! 💪