सासन रामापूर शाळांच्या परिसरात दरवर्षी पाणी साचते;मुमताज देशमुख यांचे खासदार वानखडे यांना निवेदन

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सासन रामापूर शाळांच्या परिसरात दरवर्षी पाणी साचते;मुमताज देशमुख यांचे खासदार वानखडे यांना निवेदन
सासन रामापूर शाळांच्या परिसरात दरवर्षी पाणी साचते;मुमताज देशमुख यांचे खासदार वानखडे यांना निवेदन

महाराष्ट्र वाणी न्युज 

अमरावती,दर्यापुर दि ३१ :- सासन रामापूर येथील जि.प. उर्दू शाळा व जि.प. मराठी शाळा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात तीन ते चार फूट पाणी साचते. या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यास अडचणी निर्माण होतात तसेच सर्प, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका निर्माण होतो.

या समस्येबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक सेलचे कार्यकारी अध्यक्ष मुमताज कदिरो‌द्दीन देशमुख यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. बळवंतभाऊ वानखडे यांना निवेदन दिले आहे.

देशमुख यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, दरवर्षी प्रशासनाकडे अर्ज करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे व कोणताही अप्रिय प्रकार घडू नये म्हणून शाळेच्या परिसरात पाणी साचू नये यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात.

 स्थानिकांचे म्हणणे आहे की, पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी योजना केल्यास मुलांच्या सुरक्षिततेसह शिक्षणाचा प्रश्न सुटू शकतो.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा प्रश्न तातडीने मार्गी लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.