सामाजिक उपक्रमांतून रिपब्लिकन सेनेचे पुणे शहराध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल यांचा वाढदिवस साजरा

सामाजिक उपक्रमांतून रिपब्लिकन सेनेचे पुणे शहराध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल यांचा वाढदिवस साजरा
सामाजिक उपक्रमांतून रिपब्लिकन सेनेचे पुणे शहराध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल यांचा वाढदिवस साजरा

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे (प्रतिनिधी शंकर जोग) दि २७ :- रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रिपब्लिकन सेनेचे पुणे शहराध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांतून उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात वाडिया कॉलेज, पुणे येथे महामाता रमाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर मांजरी घुले वस्ती येथे रिपब्लिकन कामगार सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. हडपसर विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी रिपब्लिकन कामगार सेनेत प्रवेश केला.

याशिवाय ससून रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, वृक्षारोपण, अनाथ मुलांना आर्थिक मदत व कपड्यांचे वाटप अशा सामाजिक उपक्रमांनी वाढदिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याचबरोबर पुणे शासकीय विश्रामगृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवराज बनसोडे, विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, कामगार सेना पुणे शहराध्यक्ष मिलिंद दादा सरवदे, युवक आघाडी शहराध्यक्ष अजय भालशंकर, महिला आघाडी शहराध्यक्ष स्नेहाताई गायकवाड, उपाध्यक्ष बाळासाहेब हजारे, संतोष साखरे, पप्पू खलसे, बाबुभाई पठाण, अरबाज पठाण, दत्ता शेंडगे, सोमनाथ लोंढे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

👉 महाराष्ट्रवाणी सोबत राहा – प्रत्येक ठळक घडामोडींच्या बातम्यांसाठी!