सतीश चव्हाण यांची विभागीय आयुक्तांची भेट; अतिक्रमणमुक्त मोहिमेत घरकुलधारकांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा

सतीश चव्हाण यांची विभागीय आयुक्तांची भेट; अतिक्रमणमुक्त मोहिमेत घरकुलधारकांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा
सतीश चव्हाण यांची विभागीय आयुक्तांची भेट; अतिक्रमणमुक्त मोहिमेत घरकुलधारकांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २३ जुलै :– महानगर प्राधिकरण क्षेत्रातील अतिक्रमणमुक्ती मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज आमदार सतीश चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महानगर प्राधिकरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेतील स्थानिक नागरिकांच्या अडचणी, प्रश्न व त्यांच्या संरक्षणासंबंधी मुद्दे सविस्तरपणे मांडण्यात आले.

यावेळी आमदार चव्हाण यांनी विभागीय आयुक्तांचे लक्ष वेधले की, संपूर्ण महानगर प्राधिकरण क्षेत्र अतिक्रमणग्रस्त नसून अनेक नागरिकांकडे त्यांच्या राहत्या जागांचे अधिकृत कागदपत्रे आणि मालकी हक्काचे अभिलेख उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा रहिवाशांवर अन्याय होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

ते पुढे म्हणाले, “ज्या नागरिकांचे घरे, दुकानं अधिकृत कागदपत्रांसह आहेत, परंतु अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे वास्तव्य धोक्यात आले आहे, त्यांना शासनाने कायदेशीर नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे.” त्यांनी विभागीय आयुक्तांकडे या संदर्भात स्पष्ट आणि ठोस मार्गदर्शन करण्याची मागणी केली.

या बैठकीला गंगापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दिलीप बनकर, अशोक गायकवाड, समीर सय्यद, नवनाथ वैद्य, कल्याण पदार आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने अतिक्रमणमुक्त मोहिम गरजेची असली तरी यामध्ये शेकडो कुटुंबांचे न्यायहक्क अबाधित राहावेत, यासाठी आमदार चव्हाण यांनी प्रशासनाला सजग आणि संवेदनशील भूमिका घेण्याचे आवाहन केले.

 वाचा, विचार करा आणि तुमचा हक्क जाणून घ्या!